आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे बाेरसे, रेलन, मासुळेंचे नाव आघाडीवर:नवीन उपमहापाैर मिळणार 12 डिसेंबरला, तिघ इच्छूक

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांना संधी मिळावी यासाठी भाजपचे उपमहापौर अनिल नागमाेते यांनी सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर उपमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता नवीन उपमहापौरांची निवड करण्यासाठी १२ डिसेंबरला दुपारी तीन वाजता महापालिकेत महासभा होईल. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची निवड केली आहे.

भाजपने जास्तीत जास्त नगरसेवकांना महाापाैर, उपमहापाैरपदावर काम करण्याची संधी मिळावी यासाठी महापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष व उपमहापाैरांचा कार्यकाळ सहा महिने निश्चित केला आहे. त्यानुसार अनिल नागमाेते यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला. आता या जागेसाठी भाजपचे नगरसेवक नागसेन बाेरसे, हर्ष रेलन व अमाेल मासुळे यांचे नाव चर्चेत आहे. या तिघांपैकी एकाला अथवा अन्य नगरसेवकाला भाजपकडून संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...