आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातापी पाणीपुरवठा योजनेच्या सुकवद पपींग स्टेशनसह अक्कलपाडा योजनेसाठी पुढील आठवड्यात नवीन पंपसेट बसवण्यात येणार आहे. हे काम पुढील आठवड्यात सुरू होईल. काही महिन्यापासून अक्कलपाडा योजनेचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेसाठी १० मार्चनंतर नवीन पंप येणार आहे. पंप आल्यावर बसवण्याचे काम सुरू करण्यात येईल.
तसेच तापी योजनेच्या सुकवद पपींग स्टेशनचे पंपही जुने झाले आहे. त्यांची पाणी उपसण्याची क्षमता घटली आहे. त्यामुळे या ठिकाणीही नवीन पंप बसवण्यात येणार आहे. अक्कलपाडा येथे पाच व सुकवद येथे तीन पंप बसवण्यात येणार आहे. मार्चअखेर काम होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.