आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के झाले आहे. या योजनेतून मार्चअखेर पाणीपुरवठा सुरू होईल. ही योजना सुरू झाल्यावर धुळेकरांना नियमित पाणी मिळेल. नवीन योजनेची चाचणी १५ मार्चपर्यंत करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महापालिका स्थायी समितीचे मावळते सभापती शीतल नवले यांनी दिली. महापालिका स्थायी समितीचे सभापती शीतल नवले यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. वर्षभरात शहरात केलेल्या कामांची सभापती नवले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एक वर्षाच्या कार्यकाळात स्थायी समितीच्या माध्यमातून विविध निर्णय घेतले. शहरात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीविषयी तक्रारी वाढल्याने या कंपनीचा ठेका रद्द केला.
नवीन ठेकेदार नेमल्याने आता कचरा संकलन सुरळीत सुरू आहे. वॉटरग्रेस कंपनीने महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला. दुसरीकडे महापालिकेनेही अटी शर्त भंग केल्याने वॉटरग्रेस कंपनीच्या अक्कलपाडा येथे ४ पंप अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेअतंर्गत २५० अश्वशक्तीचे क्षमतेचे ४ पंप बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
विरोधात ४ कोटींचा दावा दाखल केला. डास निर्मूलनाचा जास्त रकमेचा ठेका रद्द केल्याने मनपाचे ४ कोटी ५० लाख रुपये वाचले. शहरातील मालमत्ताचे जीआयएस मॅपिंग होते आहे. त्यामुळे शहरात नवीन ६५ हजार घरांची नोंद झाली. मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करणारी धुळे महापालिका राज्यातील दुसरी आहे. मनपाचे पंपिंग स्टेशन, मनपाच्या प्रशासकीय इमारतीत सोलर पॅनल उभारणे नियोजन असल्याचे सभापती नवले यांनी सांगितले.
अक्कलपाडा येथे ४ पंप
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेअतंर्गत २५० अश्वशक्तीचे क्षमतेचे ४ पंप बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
स्मारकांसाठी निधी तरतूद
शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी १ कोटी, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी ७५ लाखांची तरतूद केली आहे. या कामाचे १९ फेब्रुवारीला भूमिपूजन होणार असल्याचे मावळते सभापती शीतल नवले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.