आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मुंबईला जाण्यासाठी नवी रेल्वे‎ उद्यापासून; तीन दिवस सेवा

दोंडाईचाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎मुंबई सेंट्रल ते भुसावळ ०९०५१ व‎ भुसावळ ते मुंबई सेंट्रल ०९०५२ ही‎ स्वतंत्र रेल्वे ९ जानेवारीपासून ३१‎ मार्चपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर‎ धावेल.‎ भुसावळ ते बांद्रा टर्मिनस‎ खान्देश एक्स्प्रेसला प्रवाशांचा‎ चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे‎ खान्देश एक्स्प्रेस रोज करावी, अशी‎ मागणी होत होती. पण मध्य‎ रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे या‎ रेल्वेला ट्रॅक उपलब्ध होत नव्हता.‎ पण मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व रेल्वे‎ बोर्ड समितीच्या बैठकीत आमदार‎ जयकुमार रावल व खासदार डॉ.‎ सुभाष भामरे, खासदार उन्मेष‎ पाटील खासदार हीना गावित यांनी‎ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे‎ राज्यमंत्री रावसाहेब दानवे‎ यांच्याकडे हा विषय लावून धरला.‎

त्यानंतर आता मुंबई सेंट्रल ते‎ भुसावळ ०९०५१ व भुसावळ ते मुंबई‎ सेंट्रल ०९०५२ ही रेल्वे प्रायोगिक‎ तत्त्वावर सुरू करण्यास मंजुरी‎ मिळाली आहे. ही रेल्वे ९‎ जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत‎ प्रायोगिक तत्त्वावर धावणार आहे.‎ ही रेल्वे रविवार, मंगळवार व‎ शुक्रवारी रात्री ११ वाजून ५५‎ मिनिटांनी मुंबई सेंट्रलहून सुटेल. ती‎ बोरीवली, भोईसर, वापी, बलसाड,‎ नवसारी, चलथान, भेस्तान,‎ बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार‎ मार्गे सकाळी ९ वाजता दोंडाईचा, ९‎ वाजून २८ मिनिटांनी शिंदखेडा,‎ ९.४३ मिनिटांनी नरडाणा, सकाळी‎ १० वाजता अमळनेर, १० वाजून ४७‎ मिनिटांनी धरणगाव, ११ वाजून १०‎ मिनिटांनी पाळधी, ११ वाजून ५५‎ मिनिटांनी जळगाव व दुपारी १२‎ वाजता भुसावळ येथे पोहोचेल.‎ तसेच सोमवार, बुधवार व शनिवारी‎ सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी‎ भुसावळ येथून सुटेल. ती ७ वाजून‎ ४४ मिनिटांनी नरडाणा, रात्री ८‎ वाजता शिंदखेडा व रात्री ८ वाजून‎ १८ मिनिटांनी दोंडाईचा येथून सुटेल.‎ या रेल्वेला बोईसर व वापी येथे थांबा‎ देण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...