आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी तापमान:उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 10 अंशांवर

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून तापमानात बदल होण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी रात्री किमान तापमान १०.५ अंशांपर्यंत घसरले होते. यंदाच्या हिवाळीतील हे सर्वात कमी तापमान होते. शहराच्या वातावरणात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बदल होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीचे किमान तापमान कमी होत असताना दिवसाचे कमाल तापमान मात्र अद्याप कमी झालेले नाही.

अद्यापही दिवसाचे कमाल तापमान ३० अंशांवर आहे. शहरात सायंकाळनंतर गारवा जाणवतो. किमान तापमान सोमवारी १२.५ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी किमान तापमानात घसरण होऊन ते १०.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. कमाल तापमानही १ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. ते ३१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात रात्रीचे किमान तापमान आणखीन घसरण्याची शक्यता आहे.

दिवसा चटके कायम
रात्री तापमान कमी हाेत असताना दुसरीकडे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे दिवसा उन्ह व रात्री थंडी असा दुहेरी वातावरणाचा अनुभव नागरिकांना येतो आहे.

बातम्या आणखी आहेत...