आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील तृतीय व चतुर्थ श्रेणीचे ९ हजार ५०० कर्मचारी उद्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपात सहभागी होतील. सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीशी संलग्न जिल्ह्यातील ५७ कर्मचारी संघटना संपात असतील. संप कालावधीत कामकाज ठप्प होणार नाही यासाठी सर्व मदार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर असेल. तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी बैठकीत स्थितीचा आढावा घेतला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे कामकाज ठप्प होणार असून, सोमवारी राज्य शासनाकडून दिवसभर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यासह सूचना दिल्या जात होत्या.
त्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होऊ नये अशी सूचना झाली आहे. तसेच सर्व खाते प्रमुखांना त्यांच्या अखत्यारित असलेले कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेत गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेण्यात येणार आहे.
आरोग्य केंद्र कार्यरत
संपात तृतीय व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी सहभागी होणार असले तरी डॉक्टर, कंत्राटी कर्मचारी, एनएचएमएमचे कर्मचारी संपात नसल्याने ते कार्यरत असतील. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र सुरू असतील, अशी माहिती देण्यात आली.
अधिकारी घेणार परीक्षा
संपात माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षेला फटका बसेल. परीक्षेचे नियोजन प्रथम व द्वितीय श्रेणीचे अधिकारी करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. संपावर तोडगा निघाला नाही तर बुधवारी होणारी परीक्षा अडचणीत येऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.