आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जप्त:गौण खनिजाची वाहतूक करणारी नऊ वाहने जप्त

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैधरीत्या गाैण खनिजांचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाच्या पथकांनी कारवाई सुरू केली आहे. त्यानूसार धुळे तालुक्यात सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धाेडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्या पथकाने नऊ वाहनासह लाखाे रूपयांचे गाैण खनिज जप्त केले.

तहसीलदार सैंदाणे यांनी न्याहळोद, दह्याणे, ब्रेंद्रेपाडा शिवारात कारवाई केली. या कारवाईत अवैधरीत्या गौण खनिजांची वाहतूक करणारी नऊ वाहने ताब्यात घेतली. त्यात ५ ट्रॅक्टर, ३ डंपर आणि १ पोकलॅण्ड आहे. दह्याणे-बह्याणे शिवारात अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन झाले आहे.

या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठींना दिले आहे. ही कारवाई तहसीलदार गायत्री सैंदाणे, मंडळ अधिकारी सी. यू. पाटील, किरण कांबळे, दिलीप चौधरी, विजू पाटील, बांगर व सागर नेमाने, समाधान शिंदे, तलाठी महेंद्र पाटील, भूषण चौधरी, अतुल तारले, संदीप गवळी, गजानन सोनवणे यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...