आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढती महागाई:ना नीती, ना मेळ फक्त महाग होतेय पेट्रोल, डिझेल; शिवसेना व युवासेनेतर्फे येथे थाळी बजाव आंदोलन

दोंडाईचा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेना व युवासेनेतर्फे येथे थाळी बजाव आंदोलन झाले. तसेच खडीसाखर वाटप करण्यात आली. ना नीती ना मेल बस मेहंगा पेट्रोल-डिझेल, बहोत होई मेहंगाई की मार होश मै आओ मोदी सरकार, देश संभाले संता-बंता बेहाल हो गई सारी जनता, आदी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात युवासेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कोळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा समन्वयक डॉ. भरत राजपूत, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, छोटू पाटील, उपतालुका प्रमुख, शैलेश सोनार, विजय भोई, आबा चित्ते, राज ढोले, राकेश पाटील, राजू देशमुख, युवासेनेचे सुमीत देशमुख, प्रदीप पवार, बापू राणा, भूषण चौधरी, गणेश विसावे, लखन मराठे, महेंद्र धनगर, निखिल जयसिंघानी, देवेंद्र अहिरे, विक्रम अहिरे, कैलास मालचे, जयेश बडगुजर, उमेश बागल, विक्की पाटील, भूषण कोळी, नीलेश लोणारी, गोलू पाटील, मनोज पाटील आदी सहभागी झाले होते. या वेळी शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...