आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:साक्रीतील दंगलखोर सापडेना, होळीच्या आयोजकांवर गुन्हा, डीजेमुळे झाला वाद

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्रीतील चांदतारा मोहल्ला या ठिकाणी दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणातील संशयित अजूनही पोलिसांच्या हाती आलेले नाही. ही बाब पोलिसांचे अपयश दर्शविणारी असताना पोलिसांनी आता होळी करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी नसताना डीजे लावल्यामुळे हा वाद उद‌्भवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

चांदतारा चौकात दोन गटात वाद झाला. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या सुमारे ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील तीन जण रुग्णालयात दाखल आहे. दोन्ही गटातील संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नाही. तसेच आता होळीचे आयोजक यश भटू मराठे, सौरभ रामोळे, कैलास रामोळे, अजय कैलास रामोळे, रवी ओंकार रामोळे, सचिन संजय रामोळे, भटू राजेंद्र लाडे, चेतन आत्माराम लाडे व डीजे चालक किशोर अशोक कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी डीजे लावण्यासाठी परवानगी घेतली नाही. तसेच डीजेमुळे जनतेला त्रास होईल, असे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

भोई समाज सेनेचे निवेदन, कारवाईची केली मागणी
घटनेचा भोई समाज सेनेने निषेध केला आहे. दंगलखोरांनी महिला-लहान मुलांना लक्ष्य केले. हल्ला पूर्वनियोजित असल्यामुळे दगड-विटा, हत्यारांचा वापर करण्यात आला. जखमी महिला पोलिस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी तक्रार घेतली नाही. दोषींवर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर नीलेश खेडकर, रोहित शिंगाणे, ज्ञानेश्वर भोई, बन्सी वाडिले, राजेंद्र फुलपगारे, किरण फुलपगारे यांच्या सह्या आहेत.

मग चूक कोणाची :
नियमबाह्यरीत्या डीजे लावल्यामुळे हा वाद उद्भवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण डीजेचा दणदणाट सुरू असताना गस्ती विभागाचे पथक फिरकले नसेल का, तसेच डीजेचा आवाज पोलिसांच्या कानी आलाच नाही का? हे मुख्य प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...