आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पाच वर्षांपासून नाही मानधन वाढ‎

धुळे‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना‎ सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.‎ आता आठवा वेतन आयोग लागू‎ करण्याच्या हालचाली सुरू आहे.‎ दुसरीकडे समग्र शिक्षा प्रकल्पांतर्गत‎ कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि‎ कर्मचाऱ्यांची पाच वर्षांपासून वेतनवाढ‎ झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी‎ आंदोलन सुरू केले आहे.‎ समग्र शिक्षा अभियान राज्य आणि केंद्र‎ शासनाच्या मदतीने सुरू आहे.

या‎ प्रकल्पांतर्गत विविध पदावर कंत्राटी‎ पद्धतीने कर्मचारी कार्यरत आहे. गेल्या‎ पाच वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ‎ नाही. वेतनवाढ मिळावी यासाठी‎ नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला.‎ त्यानंतर दोन महिन्यांनी त्रुटी काढून फाइल‎ परत पाठवण्यात आली. याविषयावर‎ शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली.‎ पण वेतनवाढीविषयी कोणताही निर्णय‎ झाला नाही. अभियानात २५ वर्षांपासून‎ अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने‎ काम करत आहे. त्यामुळे त्यांना वेतनश्रेणी‎ लागू करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी मुंबईत‎ धरणे आंदोलन सुरू केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...