आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:आरोग्य, पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्यांना नाही पगार

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पीची साथ आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही काम केले. त्यानंतरही पशुसंवर्धनसह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सण अग्रीमसह नियमित वेतन अद्याप मिळालेले नाही. दिवाळी संपली निदान आता तरी वेतन द्यावे, या मागणीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे याविषयाकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वीही चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतरही हा प्रश्न सुटलेला नाही. पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी लम्पीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानंतरही त्यांना दिवाळीत सण अग्रीम व वेतन मिळाले नाही. याविषयाकडे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळ्या फिती लावून निदर्शन केली.

पशुसंवर्धन व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मुदतीत वेतन द्यावे, वेतनास विलंब करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी झाली. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन गुंडले, उपाध्यक्ष सचिन कराड, सचिव विनोद वानखेडे, कार्याध्यक्ष संजय पाटील आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...