आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मोकाट गुरांच्या मालकांना नोटीस; उद्यापासून कारवाई

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात माेकाट जनावरांची समस्या गंभीर झाली असून, वारंवार वाहतूक कांेडी होते. याविषयी ‘दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर गुरुवारी महापालिकेत बैठक झाली. बैठकीत शनिवारपासून माेकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची सूचना आयुक्त देविदास टेकाळे यांनी केली.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त शिल्पा नाईक, कर मूल्य निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाठ, मुख्य लेखाधिकारी गजानन पाटील, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते. शहरातील १२० गुरांच्या मालकांना नोटीस देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. ज्यांना नोटीस दिली आहे त्यांनी चोवीस तासाच्या आत गुरे ताब्यात घ्यावी, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा बैठकीत देण्यात आला. बैठकीत कचरा संकलनावर चर्चा झाली. अस्वच्छतेच्या तक्रारी नागरिकांनी टाेल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात अशी सूचना करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेण्यात आला.

तापी नदीतून मातीमिश्रित पाणी वाहत असल्याने जलशुद्धीकरणात अडचणी येत आहे. लवकरच पाणीपुरवठा वितरण सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. या वेळी अतिक्रमण निर्मूलन, रस्ते व पथदिवे दुरुस्तीवर चर्चा झाली. महापालिका प्रशासनातर्फे मोकाट गुरांच्या मालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईत सातत्य असावे, ही कारवाई तात्पुरती असू नये, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

बातम्या आणखी आहेत...