आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या निवडणूक ८आठवड्यात घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात दिले आहेत. त्यानुसार निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्वाचन अधिकारी तसेच सहाय्यक निर्वाचन अधिकाऱ्यांची नियुक्ती मागील महिन्यात केली. निवार्चन अधिकाऱ्यांनी मतदार यादी निश्चित केली आहे. मतदार यादीनुसार ३२ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची अधिसूचना दोन दिवसात प्रसिध्द होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक २०१९-२० मध्ये होणे आवश्यक होते. मात्र त्यानंतर दोन वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरदेखील नियोजन समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या नाही. यामुळे जिल्हा परिषद कृषी सभापती संग्राम पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर ४ एप्रिल रोजी अंतीम सुनावणीत न्यायालयाने आठ आठवड्यात निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांना दिले आहेत.
आता पर्यंत पाच आठवडे उलटले. नंतर निर्वाचन अधिकारी व सहाय्यक निर्वाचन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या निवडणुकीचे निर्वाचन अधिकाऱ्यांनी मतदार यादी निश्चित केली आहे. तसेच मतदार संख्येनुसार निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात येत आहे. त्यानंतर दोन दिवसांत जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम जाहिर करण्यात येणार आहे. नियोजन समितीवर ३२ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
तर चार स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य हे मतदानाचा हक्क बजावतील. यात लहान नागरी क्षेत्र, मोठे नागरी क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र अशा तीन गटातून ३२ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. तर आता जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी करण्यात येणार आहेत. त्यामुळे समितीवर कोणाची वर्णी लागते याकडे उत्सुकतेने पाहिले जाणार आहे.
असे आहेत निवडणूक क्षेत्र आणि मतदार
लहान नागरी क्षेत्र, मोठे नागरी क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र अशा तीन गटातून ३२ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. नियोजन समितीसाठी जिल्हा परिषदचे ५६, महापालिकेचे ७४, साक्री नगरपंचायतीचे १७ व शिंदखेडा नगरपंचायतीचे १८ असे एकूण १६५ सदस्य मतदान करणार आहेत. सध्या दोंडाईचा आणि शिरपूर नगरपालिकेवर प्रशासक आहेत. यामुळे या दोन मतदार संघातून मतदार नाहीत. तसेच निमंत्रित ११ सदस्यांना देखील मतदान करता येणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.