आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:बोरद शाळेत विद्यार्थ्यांना दप्तरसह‎ पोषण आहार प्लेटचे केले वाटप‎

बोरद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व ‎ज्युनियर कॉलेज या ठिकाणी‎ कार्यरत असलेले शिक्षक दांपत्यांनी ‎ गरीब तसेच अनाथ विद्यार्थ्यांना‎ दप्तर व पोषण आहार प्लेटचे वाटप ‎केले.‎ बोरद येथील माध्यमिक शाळेत‎ इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे ‎साधारणतः ९०० विद्यार्थी शिक्षण‎ घेत आहेत. शाळेचे शिक्षक नंदूगीर ‎ ‎गोसावी यांनी आपले वडील‎ बन्सीगीर गोसावी यांच्या स्मरणार्थ‎ ५० प्लेटचे वाटप केले.

तसेच‎ त्यांच्या पत्नी व शाळेतील‎ उपशिक्षिका वैशाली गोसावी यांचे‎ बंधू श्याम गोसावी यांनी आपले‎ वडील बन्सीगीर गोसावी यांच्या‎ ‎स्मरणार्थ विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप‎ केले. ते सध्या ऑस्ट्रेलिया या‎ ठिकाणी नोकरीला असून ह्या‎ दप्तराचे वाटप त्यांच्या भगिनी‎ वैशाली गोसावी यांनी केले. त्यांच्या‎ या अभिनव अशा उपक्रमाचे‎ पालकांकडून विद्यार्थ्यांकडून तसेच‎ शाळेतील शिक्षकांकडून व‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुक‎ केले जात आहे. या वेळी प्राचार्य‎ नीलेश सूर्यवंशी यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक भटू‎ पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम‎ घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...