आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करेन, अशा आशयाची शपथ मंगळवारी जागतिक तंबाखूमुक्ती दिनानिमित्त येथील पालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिली. सध्या जगभरात तंबाखू वापरामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. तंबाखू हा कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारासाठी प्रमुख कारणीभूत घटक ठरत आहे. त्यामुळे शासनाने तंबाखू नियंत्रणासाठी वेळोवेळी विविध उपाययोजना करून काही प्रमाणात तंबाखूच्या प्रचार, प्रसार व वापरास आळा घातला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची सर्वत्र अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन मुख्याधिकारी सिनारे यांनी केले. या प्रसंगी पालिकेचे मिळकत विभागप्रमुख सचिन महाडिक, लेखापाल पारस गुजर, वसुली निरीक्षक राजेंद्र सैंदाणे, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण, बांधकाम अभियंता आशिष महाजन, अजिंक्य डोडवे, लिपिक चेतन गांगुर्डे, गोटूलाल तावडे, प्रकाश चौधरी, जितू साळी, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नाईक, जावेद शेख, विजय चौधरी यांच्यासह पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक बहुसंख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.