आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभेत मंजुरी:पालिकेच्या जागेच्या आरक्षण बदलासाठी हरकती

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका प्रशासनाचे शहरात नवीन व्यापारी संकुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात मनपाच्या नूतन प्रशासकीय इमारती शेजारील जागा व नवरंग जलकुंभा शेजारील जागेवर व्यापारी संकुल उभारायचे आहे. मात्र जागेचे आरक्षण बदलवून ते वाणिज्य वापरासाठी करावयाचे आहे. त्या विषयाला महासभेत मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर याकरता नागरिकांकडून हरकती मागवून तो प्रस्ताव शासनाकडे द्यावयाचा आहे.

महापालिकेला शहरात विविध विकास कामे, योजना राबवण्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध होते. मात्र काही कामे महापालिकाही त्यांच्या निधीतून करते. याकरता महापालिकेला स्व उत्पन्नाचे स्त्रोतही आवश्यक आहे. त्याकरता महापालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे नवीन स्त्रोतही शोधण्यात येतात. महापालिकेचे शहरात व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलाच्या माध्यमातून महापालिकेला गाळे भाडे व मालमत्ता कराच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होते. शहरात मनपाचे मालकीचे व्यापारी संकुल आहे. त्याप्रमाणेच आता नवीन प्रशासकीय इमारतीच्या शेजारील शाळेच्या जागेवर नवीन संकुल उभारणे प्रस्तावित आहे. येथील शाळेचे स्थलांतर करण्यात आले आहे. ही जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.

शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार
हरकती, सूचना मागवण्यात येऊन तो प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यावर शासनाकडून मंजुरी प्राप्त होऊन संकुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे. या दोन्ही ठिकाणी मिळुन शंभर ते दिडशे गाळे येथे होणार आहे. यामाध्यमातून पालिकेला मोठे उत्पन्न प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे देवपूर भागासाठी नवीन भाजी मंडईचाही विषय मार्गी लागला असून निविदा प्रक्रिया होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...