आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवदान:भडणे येथील पोलिस पाटलांच्या मदतीने ओडिशाचा युवक नातलगांच्या स्वाधीन

धुळे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत-भुसावळ रेल्वेने ओडिशा राज्यातील तरुण सुरत येथून ओडिशाकडे जात होता. दरम्यान या तरुणाने शिंदखेडा तालुक्यातील भडणे गावाजवळ धावत्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी तरुणाला पोलिस पाटील युवराज माळी याच्यामुळे जीवदान मिळाले. त्याला नातलगाच्या हवाले करण्यात आले.

ओडिशा राज्यातील नारायण गुंड हा तरुण, रेल्वेतून ओडिशाकडे, पुतण्या व काका सोबत जात असताना भडणेनजीक चालत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केली. यावेळी भडणे येथील युवक माळी व संदीप पाटील व्यायाम करीत होते. त्यांनी पोलिस पाटील युवराज माळी यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. युवराज माळी यांनी तरुणांच्या नातलगांशी संपर्क करून माहिती दिली. युवक भेदरलेल्या अवस्थेत होता. मात्र त्याला कुठे जखम झाली नव्हती, घटनेची माहिती भडणे पोलिस पाटील यांनी शिदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत गोरावडे यांना दिली. या युवकाला पोलिस स्टेशन येथे घेऊन गेल्यानंतर यंत्रणेने मदत केली.

बातम्या आणखी आहेत...