आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील निमखेडी येथील विहिरीत सलग अनेक तास शोध घेतल्यानंतर प्रदीप सोनवणे याचा म़ृतदेह आढळून आला. कढोली (ता. एरंडोल) येथील रहिवाशी असलेला प्रदीप हा बेपत्ता होता. स्थानिक पोलिसात त्याच्या हरवल्याची नोंद झाली होती. शनिवारी त्याचा मृतदेह एका मोठया विहिरीत आढळून आला. धुळे तालुका पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.
कढोली येथील प्रदीप रामदास सोनवणे (वय २७) हा तरुण बेपत्ता झाला होता. दुसरीकडे धुळे तालुक्यातील निमखेडी शिवारात एक मोटारसायकल मिळून आली. तर जवळ असलेल्या एका मोठया विहीरीजवळ चप्पल व पॉकेट आढळून आले. या पॉकेटमध्ये प्रदीप याचे आधार कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स होते. माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले.
तसेच पोलिस व गावकऱ्यांनी विहीरीत शोध सुरू केला. शिवाय प्रदीपच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती दिली होती. यानंतर त्याचे कुटुंबीय देखील दखल झाले होते. मोठया व खोल असलेल्या या विहीरीत सलग शोध घेतल्यानंतर प्रदीप याचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेबद्दल अशोक महादू उंबरे यांच्या माहितीवरुन धुळे तालुका पाेलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुमित ठाकूर तपास करत आहे. दरम्यान, शनिवारी शवविच्छदेननंतर मृतदेह घेवून कुटूंबीय गावाकडे रवाना झाले.
नंबर प्लेट काढली
मृत प्रदीप हा कंपनीत कामाला होता. रागाच्या भरात तो घरुन निघाला होता. त्याने मोटारसायकलची नंबर प्लेट ही काढून टाकली हाेती. परंतु आधारकार्ड व लायसनवरुन ओळख पटली. त्याला सुमारे सहा महिन्याचा मुलगा आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.