आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:हिंदू नववर्ष स्वागत यात्रा‎ समितीचे कार्यालय सुरू‎

धुळे‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्यानिमित्त शहरातून‎ शाेभायात्रा काढण्यात येणार आहे.‎ त्यासाठी हिंदू नववर्षे स्वागत यात्रा‎ समितीची स्थापना झाली असून ‎,‎ समितीच्या संपर्क कार्यालयाचे‎ उद्घाटन शहरातील गल्ली क्रमांक‎ दाेनमधील लालबाग मारुती‎ मंदिरासमाेर करण्यात आले.‎ यंदाही २२ मार्चला हिंदू नववर्ष‎ स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे.‎ त्यासाठी संपर्क कार्यालय सुरू‎ करण्यात आले आहे.

या‎ कार्यालयाचे उद्घाटन‎ स्वामिनारायण मंदिराचे मठाधिपती‎ संत आनंदजीवनजी स्वामी यांच्या‎ हस्ते करण्यात आले. या वेळी‎ नारायण बुवा समाधी मंदिराचे‎ मठाधिपती भाऊ महाराज रुद्र,‎ महापौर प्रतिभा चौधरी, माजी‎ आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी‎ महापौर प्रदीप कर्पे, राष्ट्रीय‎ स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह‎ राजेश पाटील, भाजप महानगराध्यक्ष‎ अनुप अग्रवाल, विजय‎ पाच्छापूरकर, संदीप अग्रवाल, महेश‎ घुगरी, संजय बोरसे, हेमंत मराठे,‎ विहिंपचे राजेंद्र खंडेलवाल, हेमंत‎ देवळे, विहिंपचे जिल्हामंत्री विशाल‎ पिंपळे आदी उपस्थित होते.‎ आनंदजीवन स्वामी, हिंदू नववर्ष‎ स्वागत यात्रा समितीचे स्वागताध्यक्ष‎ शीतल नवले यांनी मार्गदर्शन केले.‎ हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...