आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा:पदाधिकारी राजीनामा, रुग्णवाहिका विक्री चर्चेत; मनसेचे शहर उपाध्यक्ष साहिल शेख यांनी राजीनामा

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडवाला झालेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवावे असे विधान केले होते. त्यानंतर मनसेचे शहर उपाध्यक्ष साहिल शेख यांनी राजीनामा दिला. तसेच पक्षाच्या रुग्णवाहिकेवरील चित्रही काढले. त्यानंतर ही रुग्णवाहिका विक्री झाल्याचा मुद्दा चर्चेत आहे. मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानानंतर मनसेचे साहिल शेख यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यापेक्षा त्यांनी मनसेच्या रुग्णवाहिकेवर असलेले मनसेचे नाव व फोटो काढल्याचा मुद्दा जास्त चर्चेत आहे. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. रुग्णवाहिका मनसेची असताना साहिल शेख यांना त्यावरील नाव व चित्र काढण्याचा अधिकार कोणी दिला असे मत पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यातून ही रुग्णवाहिका साहिल यांना विक्री केल्याचा मुद्दा पुढे आला. कोरोना काळात मनसे राज ठाकरे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले होते. त्यानंतर केवळ चारच महिन्यात ही रुग्णवाहिका विक्री झाली. एकूणच साहिल खान यांच्या राजीनाम्यापेक्षा रुग्णवाहिका विक्रीचा मुद्दा जास्त गाजतो आहे.

नवीन वाहन घेतले
रुग्णवाहिका नादुरुस्त होती. त्यामुळे ती विक्री करण्यात आली होती. याविषयी सर्वांना विचारणा केली होती. ही रुग्णवाहिका खासगी होती. आता दुसरे वाहन घेतले आहे. या वाहनाचे रूपांतर रुग्णवाहिकेत केले जाणार आहे. अॅड. दुष्यंतेराजे देशमुख, जिल्हाध्यक्ष,मनसे