आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक:अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण; बोरदला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूर्वीच्या बायपासचे रुंदीकरण करा

बोरद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोद्यानंतर मुख्य बाजारपेठ म्हणून बोरद गाव ओळखले जाते. तळोदा व शहादा तालुक्यातील ३६ खेड्यापाड्यांचा संपर्क गावाशी आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. येथे रस्त्यालगत दुतर्फा व्यावसायिक दुकाने आहेत बँक, ग्रामपंचायत, तलाठी व मंडळाधिकारी कार्यालयेही याच रस्त्याला असल्याने मोठी वर्दळ असल्याने वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी पूर्वीच्या बायपास रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी होत आहे.

व्यापारी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांपासून ते बस, मोटारसायकलीही पुढील खेड्यापाड्यात सध्याच्या मार्गाने जात असल्याने बाजारपेठेत अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी तत्कालीन जि.प. सदस्य संगीताबाई वरसाळे यांच्या प्रयत्नाने ८ वर्षांपूर्वी कलमाडी रस्त्यालगत तुळाजा रस्त्यापर्यंत बायपास मंजूर झाला होता. त्या दृष्टीने या रस्त्याचे कामही झाले. मात्र ते दर्जाहीन असल्याने व रस्त्याची रुंदी खूपच कमी असल्याने वाहने या रस्त्याने जाताना अडचणीचे ठरत होते.

बातम्या आणखी आहेत...