आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तीर्ण विद्यार्थी:ओजस्वी पाटील 88.33 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत अव्वल; बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

धूळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बुधवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात शहरासह जिल्ह्यातील शाळांनी यशाची परंपरा राखत उत्तुंग यश मि‌ळवले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विद्यार्थ्यांनी यश मि‌ळवले आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाचे मुख्याध्यापक, शिक्षकांसह कुटुंबीयांकडून कौतुक होत आहे.

नवापूर | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. दुपारी एक वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहिला. नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२१-२०२२ चा आॅनलाइन निकाल लागला असून, यात विज्ञान शाखेत प्रथम ओजस्वी हरीश पाटील ८८.३३ टक्के ५३० गुण मिळाले आहे. द्वितीय भूमिका भावीन पाटील ८८.१७ टक्के ५२९ तृतीय हर्षदा संजय बेहेरे ८७.६७ टक्के ५२६ टक्के गुण मिळाले आहेत. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते हरीश पाटील यांची कन्या आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य व शिक्षक, पालक, संचालक मंडळाने कौतुक केले आहे.

विज्ञान शाखेत मुले अव्वल तर कला शाखेत मुली
नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर बारावीचा निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मन्यार साहिल सुलेमान ८६.३३, द्वितीय क्रमांक सोमवंशी वेदांत एच ८४.००, तृतीय क्रमांक जगताप वरुण विशाल ८२.८३ तर कला शाखेत प्रथम क्रमांक कोकणी तानिया संजय ८३.५०, द्वितीय क्रमांक कोकणी शीला दौलत ८०.६७ तृतीय क्रमांक गावित रसिला छगन ७७.१७ विज्ञान शाखेचा निकाल ९८.९४ टक्के लागला तर कला शाखेचे निकाल ९७.३७ टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी कौतुक केले.

शहाद्यातही राखली गुणवत्ता
शहादा | शहरासह परिसरातील शाळांचा बारावीचा निकाल उत्तम लागला असून, यावर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे. शहरातील कै.जी.एफ.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या एकूण निकाल ९९.४० % लागला विद्यालयात विज्ञान शाखेत हिमायू सदाशिव चव्हाण ९१.१७ टक्के गुण प्रथम, दिशा बधू पटेल ९०.५० टक्के गुण द्वितीय, कला शाखेच्या एकूण निकाल ८७.२५ टक्के लागला असून, विद्यालयात अफिन बानाे इसानी ७६.५० टक्के गुण विद्यालयात प्रथम, प्रियंका बापू अलकारी ७५.३३ टक्के गुण द्वितीय, वाणिज्य शाखेच्या एकूण निकाल शंभर टक्के लागला आहे. डिंपल उमेश अग्रवाल ८८.१७ विद्यालय प्रथम, मिसबाह मेमन ८५.३३ विद्यालयात द्वितीय आली.

नाईक विद्यालयाचा ९८.७ टक्के निकाल
वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या एकूण निकाल ९८.७ टक्के लागला असून, विज्ञान शाखेत यश राजेश राठोड ८९.५० टक्के मिळवत विद्यालयात प्रथम तर चेतन प्रवीण सोनवणे ८६.३३ टक्के गुण द्वितीय. कला शाखेच्या निकाल ८९.४३ टक्के लागला. निर्जल गुरव ८२ टक्के विद्यालयात प्रथम तर कुणाल संजय भोई ७८ टक्के गुण द्वितीय.

कन्या विद्यालय ९४.२०%
शारदा कन्या विद्यालय कला शाखेच्या निकाल ९४.२० टक्के लागला. मिसबाह इक्बाल पिंजारी ८२.५० % प्रथम तर हीना कौसर मण्यार ८०.१७ टक्के गुण द्वितीय आली आहे.संस्थेचे अध्यक्ष सुधीर जाधव श्रीमती प्रतिमा जाधव संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव श्रीमती वर्षा जाधव यांनी कौतुक केले. व्हॉलंटरी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८ टक्के लागला.

मुक्ताई शाळेचा लागला १०० टक्के निकाल
डोंगरगाव जवळील मुक्ताई कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व कला दोन्ही शाखांच्या शंभर टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत परी मनोज सोनी ८५.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम तर ओम दिलीप निकम ८३ % गुण द्वितीय आला आहे तर कला शाखेत ललिता राजेश वर्मा ७४.३६ टक्के गुण प्रथम तर दीक्षा राजेंद्र आव्हाड ७४ टक्के गुण द्वितीय.

मॉडर्न इंग्लिश स्कूलचा ९६% निकाल
बोरद | मॉडर्न इंग्लिश स्कूलचा १२ वीच्या निकाल ९६ टक्के लागला. ५० विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक गीताकुमारी नेथीराम पुरोहित हिने मिळवला असून, ७९.३३ शेकडा गुण मिळवले आहेत तर द्वितीय क्रमांक भाग्यश्री कांतिलाल राठोड या विद्यार्थिनीने पटकावला असून ७७.१७ शेकडा गुण मिळाले आहेत तर तृतीय क्रमांक मेघा काशिनाथ पाटील या विद्यार्थिनीने मिळवला. त्यात तिला ७६.८३ गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी, प्राचार्य नीलेश सूर्यवंशी, पर्यवेक्षक भटू पवार व सर्व संचालक मंडळाने कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...