आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी विद्यार्थ्यांनी दिवंगत मित्राच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून मैत्री धर्म निभावला. या मदतीमुळे दिवंगत मित्राच्या कुटुंबातील सदस्यांचे डोळे पाणवले. तालुक्यातील वरूड येथील किसान विद्यालयात १९८९ मध्ये शिक्षण घेणाऱ्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावर ग्रुप बनवला होता. या ग्रुपच्या माध्यमातून सर्व मित्र एकमेकांच्या संपर्कात होते. ग्रुपमधील काही माजी विद्यार्थी अधिकारी म्हणून कार्यरत असून काही व्यापारी तर काही राजकारणात आहे. याशिवाय काही माजी विद्यार्थी शिक्षकही आहे. सुमारे ३३ वर्षापूर्वीचे मित्र जरी एकमेकांना भेटत नसले तरी सोशल मिडीयामुळे ते एकमेकांच्या संपर्कात होते. दहा दिवसापूर्वी वरूळ येथील संजय मिस्तरी या माजी विद्यार्थ्याचे निधन झाले. तो मिस्त्री काम करायचा. याविषयीची माहिती ग्रुपमधील सदस्यांना समजली.
संजय मिस्तरी यांची आर्थिक स्थिती कमकुवत होती. त्यामुळे संजय मिस्तरी यांचे मित्र व मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले जगदीश माळी यांनी ग्रुपवर मदतीचे आवाहन करणारा मेसेज अपलोड केला. सर्व सदस्यांनी मदत करण्याची तयारी दशर्ववली. त्यानूसार दोन दिवसात ५१ हजार रूपकांची मदत जमा झाली. ही रक्कम दशक्रिया विधीच्या दिवशी भरत पवार, राहुल महीरे, महेश पाटील व जगदीश माळी यांनी मिस्तरी यांच्या कुटुंबियांना दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.