आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:पाचव्या दिवशी तेराशे गणेशमूर्तींचे विसर्जन

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर अशी आळवणी करत रविवारी पाचव्या दिवशी लाडक्या बाप्पाला भक्तांनी निरोप दिला. दिवसभरात १ हजार ३०० घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जनासाठी पांझरा नदीकाठावर गर्दी झाली होती. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या कुंडात अनेकांनी विसर्जन केले. महापालिकेने निर्माल्य संकलनासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

शहरात पहिल्या टप्प्यात दीड व तीन दिवसांच्या घरगुती गणरायाला निरोप देण्यात आला. त्यानंतर रविवारी पाचव्या दिवशी काही लहान मंडळांसह घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. काही मंडळांनी वाजत गाजत मिरवणूक काढली होती. विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने पांझरा नदी किनारी सात ठिकाणी व्यवस्था केली होती. या ठिकाणी निर्माल्य व मूर्ती संकलनाची सोय आहे. तसेच कृत्रिम तलाव अर्थात पाण्याचे हौद ठेवण्यात आले आहे. विसर्जनासाठी हत्तीडोह, अंजनशाह दाता दर्गा, अग्रवाल भवन, गणपती मंदिरजवळ गर्दी झाली होती. दुपारनंतर पावसाने शहरात हजेरी लावली. अनेकांनी निर्माल्य दान केले.

बातम्या आणखी आहेत...