आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पहिल्याच दिवशी 207 जणांना‎ 11 लाखांची शास्ती केली माफ‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातर्फे‎ थकबाकीदारांकडे वसुलीची कारवाई सुरू आहे.‎ आयुक्तांनी थकीत मालमत्ता करावरील शास्ती‎ पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ ते ११‎ फेब्रुवारी दरम्यान शास्ती माफी योजनेचा लाभ घेता‎ येणार आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी २०७‎ मालमत्ताधारकांनी १६ लाख ७ हजार १४४ रुपयांचा‎ कर भरून ११ लाख ५१ हजार ४५३ रुपये शास्तीत‎ सवलत मिळवली.

महापालिकेतर्फे‎ मालमत्ताधारकांकडेही वसुली सुरू आहे; परंतु या‎ थकबाकीवरील शास्तीची रक्कम अधिक आहे.‎ मार्चपूर्वी मनपा प्रशासन शास्ती माफीचा निर्णय घेईल‎ यासाठी अनेक थकबाकीदार भरणा करण्यासाठी‎ थांबले होते. त्यानुसार आयुक्त देविदास टेकाळे यांनी‎ शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही शास्ती‎ माफी योजना ६ ते ११ फेब्रुवारीपर्यंत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...