आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता:अंगारकीनिमित्त उद्या हेरंब गणेश मंदिरात कार्यक्रम

शहादा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जयनगर येथील श्री हेरंब गणेश मंदिर परिसरात १३ सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. काेराेनानंतर प्रथमच भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता बघता हेरंब गणेश मंदिर ट्रस्ट मार्फत आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.

येथील हेरंब गणेश मंदिर खान्देशात प्रख्यात आहे. धार्मिक दृष्ट्या अंगारकी चतुर्थीला अधिक महत्त्व असल्याने दर्शनासाठी भाविकांची माेठी गर्दी असते. विशेष म्हणजे नवस फेडणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. गुजरात राज्यातील भाविकही दर्शनासाठी येतात. मंदिराची पूर्ण सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मंदिरापासून गावातील गल्लीबोळापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. ट्रस्ट मार्फत भाविकांच्या सोयीसाठी परिसरात बांबू बांधून शिस्तीने दर्शनाची व्यवस्था केली जाते.येथील बस आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्या व्यतिरिक्त शिरपूर, दोंडाईचा येथूनही जादा बसेस साेडण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...