आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुकी:कार्तिकी एकादशीनिमित्त‎ कापडणेत निघाली पालखी‎

कापडणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎ येथील विठ्ठल मंदिर ट्रस्ट व गावातील भजनी‎ मंडळातर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त विविध‎ कार्यक्रम झाले. गावातून पालखी काढण्यात‎ आली. या वेळी शंभर पेक्षा जास्त लहान‎ मुलांनी विविध वेशभूषा केल्या होत्या.‎ विठ्ठल मंदिरापासून सकाळी पालखीला‎ सुरुवात झाली. संपूर्ण गावातून दिवसभर‎ पालखी मिरवण्यात आली. ग्रामस्थांनी‎ दारोदारी पालखीचे पूजन केले. मिरवणुकीत‎ गावातील भजनी मंडळे व वारकरी सहभागी‎ झाले होते.

लहान मुलींनी डोक्यावर तुळशी‎ वृंदावन व घागर घेत मिरवणुकीत सहभाग‎ नोंदवला. विठ्ठल भजनी मंडळाचे अध्यक्ष‎ रावण माळी, पुरोहित कालिदास जोशी, रवींद्र‎ पाटील, चुडामण पाटील, शांताराम माळी,‎ ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर माळी, सुनील‎ माळी, बाबूराव पाटील, अरविंद शिंपी,‎ जिजाबराव पाटील, हेमंत पाटील, डी. के.‎ वाणी, प्रमोद माळी, सरला माळी, चंद्रभागा‎ माळी, राम जोशी, सुमन पाटील, सरला‎ पाटील, प्रमिला शिंपी आदी उपस्थित होते.‎ कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर‎ ट्रस्टतर्फे कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात‎ आले आहे. सप्ताहाचा ८ नोव्हेंबरला‎ काल्याच्या कीर्तनाने समारोप होणार आहे. या‎ वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...