आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:माघ पौर्णिमेनिमित्त एकवीरादेवी‎ मंदिरात पालखी, मुलांचे जाऊळ‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश कुलस्वामिनी‎ एकवीरा देवी मंदिरात माघ‎ पौर्णिमेचा उत्सव सुरू होता.‎ यानिमित्त मंदिरात महाआरती,‎ पूजा, आरती लावणे व बालकांचे‎ जाऊळ काढण्याचा कार्यक्रम पार‎ पडले आहे. दोन दिवसांत मंदिर‎ आवारात १५० बालकांचे जाऊळ‎ काढले आहे.एकवीरादेवी मंदिरात‎ पौर्णिमेनिमित्त भाविकांची‎ दर्शनासाठी गर्दी होती. या दिवसात‎ एकवीरा देवी मंदिरात मानमानता,‎ नवस फेडण्यासाठी भाविकांनी‎ हजेरी लावली आहे. तर माघ‎ पाैर्णिमेनिमित्त रविवारी मंदिरात‎ भाविक कुंटुबासह आले होते.‎

मंदिराच्या आवारात देवीची पालखी : दिवसभर मंदिरात भाविक‎ दर्शनासाठी येत होते. पाैर्णिमेनिमित्त देवीची सकाळी पूजा, महाआरती‎ करण्यात आली. त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारात देवीची पालखी‎ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...