आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रमाचे‎ आयोजन:नवरात्रीनिमित्त म्हाळसादेवी‎ मंदिरात सप्तशदी पाठ वाचन‎

शहादा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील म्हाळसा मंदिरात शारदीय नवरात्र‎ उत्सव सुरू असल्याने विविध कार्यक्रमाचे‎ आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी‎ काकड आरती, सकाळीस साडे आठ वाजता‎ व सायंकाळी साडे आठ वाजता आरती‎ असते. सायंकाळी साडे आठ वाजता नैवद्य‎ आरती असते. सायंकाळची आरती‎ संपल्यावर महिला भगिनी गरबा खेळतात.‎ नुकतेच दिंडोरी प्रणित स्वामी सेवा केंद्र शहादा‎ मार्फत मंदिरात दुर्गा सप्तशदी पाठ वाचन‎ करण्यात आले.

पन्नास महिला भाविकांनी‎ सामुदायिक पाठ वाचन केले. त्यामुळे संपूर्ण‎ परिसरात व भाविंकामध्ये भक्तीमय वातावरण‎ झाले आहे. मंदिर परिसरात अष्टमीला होम‎ हवन करण्याचे नियोजन असून नवमीस‎ नवदुर्गा जेवू घातल्या जाणार असल्याचे‎ समितीकडून सांगण्यात आले आहे.

कोजागरी‎ पौर्णिमेस मातेचा स्थापनेस तीन वर्ष पूर्ण झाले‎ असून मोठा भंडारा आयोजित करण्यात‎ आला आहे. असे समितीचे अध्यक्ष प्रा. गणेश‎ सोनवणे यांनी सांगितले. मातेचा दर्शनासाठी‎ पहाटेपासून गर्दी होत आहे. दिवसभर भाविक ‎दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असून मंदिर ‎ परिसरात गर्दी होत आहे. भाविकांनी दर्शनाचा‎ लाभ घ्यावा, असे आवाहन मंदीर सेवा‎ समिती मार्फत करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...