आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनानिमित्त नावीन्यपूर्ण संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस अधिकारी व अंमलदार यांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पोलिस दलाच्या वतीने सुरू झालेल्या ‘ऑपरेशन अक्षता’ या उपक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर जनमानसात बाल विवाह विरोधी जनजागृती करणे हा मोटारसायकल रॅली मागील मुख्य उद्देश होता. जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह जिल्ह्यातील इतर अधिकारी व जिल्हा पोलिस दलातील सुमारे १५० महिला पोलिस अधिकारी व महिला अंमलदार हेल्मेटसह या रॅलीत सहभागी झाल्या हाेत्या. मोटारसायकल रॅली पाहण्यासाठी शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. रॅलीला शहरातील नागरिकांनीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत मोटारसायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करून महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. पोलिस अधीक्षक पाटील, लायन्स क्लबच्या डॉ.तेजल चौधरी यांनी रॅलीस झेंडी दाखवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.