आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील दोंडाईचा जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा व मध्यभागी लावलेल्या वृक्षांच्या फांद्या वाढल्याने ठिकठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सर्वाधिक त्रास अवजड वाहनधारकांना होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेत अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर काही फुलांची तर काही शोभेची झाडे आहेत. वृक्ष लागवड काळाची गरज आहे. नगरपालिकेतर्फे रस्त्याच्या मध्यभागी झाडे लावण्यात आली, ते स्वागतार्ह आहे. नगर पालिकेमार्फत सातत्याने या झाडांना टँकरद्वारे पाणी दिले जाते. झाडे कोरडी होणार नाही याची काळजी घेतली जाते. मात्र झाडांची मोठी वाढ झाल्याने त्यांच्या फांद्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरल्याने त्या खाल रस्त्यापर्यंत येत आहेत.परिणामी त्या वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी अपघाताला आमंत्रण देणाऱ्या आहेत. लांबून त्या फांद्या नजरेस पडत नसल्याने वाहन सरळ फाद्यांना घसरून जातात. त्यामुळे ज्या फांद्या वाढलेल्या आहेत त्या पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी तोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
याव्यतिरिक्त रस्त्याच्या दुतर्फा तसेच मध्ये पालिकेचे विजेचे खांब असून त्यांना वेगवेगळे व मोठमोठे जाहिरातीचे फलक लावले आहेत. त्यामुळे समोरची वाहने दिसत नाही. असे मोठे फलकही तत्काळ काढणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. फलक लावताना त्यांचा वाहनधारकांना त्रास होणार नाही, समोरची वाहने सहज दिसतील, या आकाराचे फलक लावायला हवेत. पालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी या समस्येची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.