आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांनी पिकवली सेंद्रिय पद्धतीने एक एकरवर भाजी; आहारात तिचाच होतो वापर

कापडणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना शिक्षणासह भविष्यात शेती करून स्वतःच्या पायावर आत्मनिर्भरपणे उभे राहता यावे यासाठी धुळे तालुक्यातील वार येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी एक एकरवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादित केला. या भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात वापर केला जातो. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते आहे.

वार येथील केंद्रीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेच्या परिसरात असलेल्या एक एकर जागेवर स्वतः मिरची, टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी, दुधी, वांगी आदी भाज्यांचे उत्पादन घेतले. विद्यार्थ्यांनी स्वत: शेतीची मशागत केली. तसेच बाजारातून बियाणे आणून त्यांची लागवड केली. विद्यार्थ्यांनीच फवारणी, खते देण्याचे काम केले. विद्यार्थ्यांनी पिकवलेला सेंद्रिय भाजीपाला शाळेतच स्वयंपाकासाठी वापरला जातो. उर्वरित भाजीपाल्याची विक्री केली जाते. विद्यार्थी अभ्यास झाल्यावर पिकांना पाणी देतात. हा उपक्रम संस्थेचे चेअरमन महेंद्र विसपुते, सचिव स्मिता विसपुते, मुख्याध्यापक शेखर भावसार, अरुण मराठे, नागेश्वर बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभले.

व्यावहारिक ज्ञान मिळते शाळेत शेती करण्याचे धडे मिळाल्याचा भविष्यात उपयोग होईल. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवला आहे. भाजीपाल्याची शेती करताना मनाला आनंद मिळतो. त्याचबरोबर आर्थिक, व्यावहारिक ज्ञान मिळते आहे. सागर मोरे, विद्यार्थी, वार

बातम्या आणखी आहेत...