आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी मिळेल:गळत्या दुरुस्त केल्याने दीड लाख लिटर नासाडी टळेल;आज दुपारी मिळेल पाणी

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला २३ ठिकाणी तर अन्य भागातील जलवाहिन्यांना ७ ठिकाणी गळती लागली होती. त्यामुळे पाण्याची नासाडी होत होती. तापी योजनेच्या बाभळे जलशुध्दीकरण केंद्रात गाळ साचला होता.

त्यामुळे मनपाने गुरुवारी रात्रीपासून जलवाहिनी दुरूस्तीसह गाळ काढण्याचे काम सुरू केले. त्यासाठी पाणीपुरवठा बंद केला. हे काम शुक्रवारी रात्री पूर्ण झाले. त्यामुळे उद्या शनिवारी दुपारी शहरात पाणीपुरवठा सुरळीत होईल. आता नियमित पाच ते सहा दिवसानंतर पाणी मिळेल दावा प्रशासनाने केला. गळत्या थांबल्याने एक ते दीड लाख लिटर पाणी नासाडी टळेल. तापी जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने आठ ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे दुरुस्तीचे काम करण्यासाठी मनपाने गुरुवारी रात्री १२ वाजता तापी योजनेचा पाणी पुरवठा बंद केला. त्यानंतर शुक्रवारी पहाटेपासून जलवाहिनीच्या गळत्या रोखण्यास सूरूवात केली.

बातम्या आणखी आहेत...