आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:मोहिदा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

बोरद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुक्यातील मोहिदा येथील एकाने गळास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश मणिलाल पाडवी (२६) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. मोहिदा गावातील रहिवासी सकाळी ७.०० वाजता प्रात विधीसाठी गेले असता खळ्यांच्या परिसरात एकाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी उपसरपंच आनंदा मराठे यांना माहिती दिली.

त्यांनी चौकशी केली असता प्रकाश मणिलाल पाडवी याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्याचे वडील मनीलाल रमण पाडवी यांना याबाबत माहिती दिली. बोरद बिटचे हवालदार गौतम बोराडे, कर्मचारी नीलेश खोंडे, विजय विसावे, छोटू कोळी, राजू जगताप, तुकाराम पावरा यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार गौतम बोराडे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...