आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:बालरोग, स्त्रीरोग तज्ज्ञ, अभियंत्यासह शंभर तांत्रिक कर्मचारी मनपात येणार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या पाणीपुरवठा व आरोग्य विभागात तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे शासनाने या विभागात शंभर तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यात अभियंत्यासह स्त्रीरोग व बालरोग स्त्रीरोग तज्ज्ञासह अन्य पदांचा समावेश आहे.

महापालिकेने तांत्रिक कर्मचारी भरतीला मंजूरी देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सन २०१८ पासून प्रलंबित हाेता. तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याची बाब शासनाला पटवून देण्यात आली. त्यानंतर आता शासनाने पाणीपुरवठा विभागात ५५ व आरोग्य विभागात ४५ तांत्रिक पदे भरण्यास मंजूरी दिली. आस्थापना खर्चाची अट शिथिल करून ही मान्यता देण्यात आली आहे.

चार वर्षापासून प्रस्ताव शासनाकडे होता प्रलंबित गेल्या चार वर्षापासून तांत्रिक कर्मचारी भरतीचा प्रस्ताव प्रलंबित हाेता. हा प्रस्ताव मान्यतेसाठी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरीश पटेल, राजवर्धन कदमबांडे यांनी सहकार्य तर खासदार डाॅ. सुभाष भामरे, भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांनी पाठपुरावा केल्याची माहिती महापाैर प्रदीप कर्पे, उपमहापाैर नागसेन बाेरसे, स्थायी समिती सभापती शीतल नवले यांनी दिली.

या नियमानुसार समावेशन ग्रामपंचायतीच्या ७२ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४९३ संक्रमण कालीन तरतुदीमधील परिशिष्ट ४, भाग १ चे नियम ५ (क) अन्वये मनपाच्या आस्थापनेवर सामावले जाणार आहे. सर्व ७२ कर्मचारी आदेश मिळाल्याच्या तारखेपासून कार्यरत असतील. त्यांना मनपाच्या वेतन श्रेणीनुसार वेतन, भत्ते व सेवाविषयक आर्थिक लाभ मिळतील. सेवानिवृत्तीच्या वेळेस त्यांची सेवा जाेडण्यात येईल. पण आर्थिक लाभ मिळणार नाही.

‘त्या’ ग्रामपंचायतीचे ७२ कर्मचारीही आस्थापनेवर मनपा हद्दीत वलवाडी, भाेकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चिताेड, नगाव, वरखेडी, बाळापूर, माेराणे, पिंप्री या ११ गावांचा समावेश झाला होता. या गावातील ग्रामपंचायतीत ७८ कर्मचारी हाेते. सद्य:स्थितीत ७२ कर्मचारी कार्यरत होते. त्यांना मनपा आस्थापनेवर घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी पाठवला होता. हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. शैक्षणिक पात्रता धारण करत नसलेले कर्मचारी अपात्र ठरले आहे. ग्रामपंचायतीतील १७ लिपीक, ११ शिपाई, १६ वाॅटरमन, व्हाॅल्वमन, एक वायरमन, २७ सफाई कर्मचाऱ्यांना मनपा आस्थापनेवर सामावून घेण्यास मान्यता मिळाली आहे. उर्वरित २३ कर्मचाऱ्यांना कायम पदावर घेण्यात येईल. त्यात १३ लिपीक, १० व्हाॅल्वमन, वाॅटरमनचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...