आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:पारोळा रस्त्यावरील अपघातात एक ठार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पारोळा रस्त्यावर भरधाव वेगातील वाहनाने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. देवपुरातील चंदननगर परिसरात राहणारे नाना रघुनाथ दिघे (वय ५५) हे मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. पारोळा रोडवरून ते पायी जात असताना त्यांना भरधाव वेगातील वाहनाने धडक दिली. सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला होता.

या जखमी झालेले नाना दिघे यांच्यावर हिरे रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या पत्नी प्रमिला नाना दिघे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...