आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्गार:सुविधांसाठी एक महिना मुदत मग आयुक्त; जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

धुळे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कर भरूनही सुविधा मिळत नाही. रस्ते, अस्वच्छता, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नांसाठी आता वकील आक्रमक झाले आहे. त्यांनी या समस्यांना वाचा फोडण्याचा निर्धार शनिवारी झालेल्या बैठकीत केला. त्यानुसार ७ नोव्हेंबरला झोपेचे साेंग घेतलेल्या प्रशासनाचा लाल फिती लावून निषेध केला जाईल. समस्या सोडवण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाईल. त्यानंतरही समस्या सुटल्या नाही तर जिल्हाधिकारी, आयुक्तांना नोटीस देण्यात येईल. बैठकीला वकील संघाचे अध्यक्ष आर.डी.जोशी अध्यक्षस्थानी होते. अॅड.मधुकर भिसे,अॅड. दिनेश गायकवाड, अॅड.पुरुषोत्तम महाजन, अॅड.रसिका निकुंभ,अॅड.एम. एस. पाटील, अॅड.कुंदन पवार, अॅड. रमेश सोनवणे, अॅड. विलास झाल्टे,अॅड.श्यामकांत पाटील आदी उपस्थित होते. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अंगदुखी जडली आहे. पाणी वेळेत मिळत नाही. त्यामुळे झोपेचे साेंग घेणाऱ्यांच्या मागे लागल्याशिवाय कामे होणार नाही, असे मत वकिलांनी व्यक्त केले.

असे होईल आंदोलन
या वेळी आर.डी. जोशी म्हणाले की, जिल्हाधिकारी व मनपा प्रशासनाच्या विरोधात सोमवारी लाल फिती लावून निषेध करू. त्यानंतर समस्या सोडवण्यासाठी यंत्रणेला एक महिन्याचा वेळ दिला जाईल. त्यानंतरही समस्या सुटल्या नाही तर नोटीस व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षित करणे आवश्यक
सुविधांसाठी आंदोलन करण्यासाठी नागरिकांनाही शिक्षित कसे करता येईल, याकडे लक्ष देण्यात यावे.- अॅड. राहुल पाटील, धुळे

स्वच्छतेचा केवळ जुमला
ढिम्म प्रशासनातील सर्वांनी झोपेचे सोंग घेतले आहे. शहर स्वच्छ-सुंदर करण्याचे स्वप्न दाखवणे हा केवळ जुमला होता. -अॅड. कुंदन पवार, धुळे

रस्त्यावर येणे आवश्यक
नागरी समस्यांबद्दल काही दिवसांपूर्वीच महिलांनी पुढाकार घेतला आहे. आता एकत्र रस्त्यावर यावे लागेल.-अॅड. रसिका निकुंभ, धुळे

बातम्या आणखी आहेत...