आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:खूनप्रकरणी एकाला 7 वर्षांची शिक्षा

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कळमसरे येथील धर्मा भील यांच्या हत्या प्रकरणात धुळे न्यायालयाने एकाला ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील कळमसरे येथे १६ जून २०२० रोजी धर्मा भील यांचा सुरेश गुमानसिंग पावरा यांच्याशी उसनवारीचे दोनशे रुपये परत देण्यावरून वाद झाला होता. सुरेश गुमानसिंग पावराने धर्मा भील यांच्या छातीवर बसून त्यांना मारहाण केली होती. तसेच गळा दाबला होता. घटनेनंतर धर्मा भील यांना घरी नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पत्नी गंगाबाई यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. तपासणी केल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

या प्रकरणी सुरेश गुमानसिंग पावरावर गुन्हा दाखल झाला. खटल्याचे कामकाज धुळे सत्र न्यायालयाचे न्या. एस. सी. पठारे यांच्या समोर झाले. सुरेश पावराने गळा दाबल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी नमुद केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी.डी. भोईटे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्यादी भुरीबाई भील, पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच चौकशी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवली. न्या. एस. सी. पठारे यांनी या प्रकरणातील सुरेश गुुमनसिंग पावराला ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

नुकसान भरपाई देण्याची केली सूचना
मृत धर्मा भील यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब उघड्यावर आल्याने याबाबीचा विचार करावा, याकडे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भोईटे यांनी लक्ष वेधले होते. त्यामुळे न्या. एस. सी. पठारे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मृताच्या वारसांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी अशी सूचना दिली. अभियोक्ता बी. डी भोईटे यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय मुरक्या तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जगदीश सोनवणे व शुभांगी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...