आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:नगावला एक हजार गुरांचे केले लसीकरण

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात लंपी स्कीनचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. त्यानुसार धुळे तालुक्यातील नगाव येथे एक हजार जनावरांना पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लस देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत भदाणे यांच्या संकल्पेतून हा उपक्रम राबवण्यात आला. लंपी स्कीन हा आजार विषाणूजन्य चर्मरोग असून, जनावरांना तो झाल्यावर पशुपालकांना फटका बसतो. तसे होऊ नये या उद्देशाने लसीकरण शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पशुसंवर्धन विकास विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत निकम, डॉ. संदीप निकम, डॉ. जगदीश बागुल, डॉ. एन.बी. पाटील, डॉ. एम.बी. चौधरी, डॉ.पोपट चौधरी, पी.जी. भामरे, आर. के. ठाकरे, डॉ. नीलेश पाटील, भटू पाटील, हर्षल पाटील, नंदलाल भामरे, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...