आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कांद्याचे दर क्विंटलमागे हजाराने वाढले

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात कांद्याची आवक वाढलेली असतांनाही उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्रात उत्पादीत कांद्याला अधिक मागणी असल्याने गेल्या पंधरा दिवसात कांद्याच्या दरात क्विंटलमागे एक हजार रूपये वाढ झाली आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सर्वाधिक मक्याची लागवड केली. तसेच अनेक बागायतदार शेतकऱ्यांकडून कांद्याचीही लागवड झाली. साधारणपणे दसऱ्यानंतर हिवाळी कांदा बाजारात येतो. त्यानूसार दिवाळीनंतर बाजार समितीत कांद्याची आवक सुरू झाली आहे. पंधरा दिवसापूर्वी कांद्याची आवक कमी असतांना प्रती क्विंटल दर १ हजार ६०० रूपयापर्यंत हाेते.

त्यानंतर आवक काही प्रमाणात वाढली. तसेच उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्रातील कांद्याला अधिक मागणी असल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. साधारणपणे पंधरा दिवसात दरात क्विंटलमागे एक हजार रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवस कांद्याचे दर वाढते राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

अशी आहे कांद्याची आवक व दर : खान्देशात प्रामुख्याने लाल कांद्याचे अधिक उत्पादन घेतले जाते. बाजार समितीत राेज साधारणपणे दीड हजार ते १ हजार ८०० क्विंटल कांद्याची आवक हाेते आहे. दर २ हजार १०० पासून २ हजार ८०० रूपयांपर्यंत आहे. पांढऱ्याचे कांद्याचे दर १ हजार ७०० रूपये क्विंटल आहे. त्याची आवक अगदीच कमी म्हणजे ३० ते ३५ क्विंटल इतकीच आहे.

मका आवक वाढली, दर गेला २ हजारावर
बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. सद्यस्थितीत रोज २ हजार १०० ते अडीच हजार क्विंटल मक्याची आवक होते आहे. दर साधारणपणे २ हजार १७ रूपये क्विंटल आहे. बाजार समितीच्या आवारात ठिकठिकाणी मका पसरवण्यात आला आहे. मक्क्याची आवक अजून पंधरा ते वीस दिवस सुरू राहील असा अंदाज व्यक्त होतो आहे.

बातम्या आणखी आहेत...