आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी स्पॉट रिपाेर्ट:नकाणे रस्त्याचे 2 किमीपैकी 70 टक्केच काम दीड वर्षात झाले पूर्ण

धुळे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख रस्त्यांचे काम करण्यासाठी १०१ कोटी मंजूर झाले होते. त्यातून काही रस्त्यांची कामे सुरू झाली. त्यात नकाणे रोडवरील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्यापासून पांझरा नदीवर कुमारनगर जवळ असलेल्या पुलापर्यंतच्या कामाचा समावेश होता. हे अंतर दाेन किलोमीटर असून आत्तापर्यंत केवळ ७० टक्के काम झाले आहे. उर्वरित ३० टक्के दोन वर्षांपासून रखडले आहे. मनपाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम जमा न केल्याने शासनाचा निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने थांबवले.

रस्त्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०१ कोटी मंजूर केले होते. त्यात महापालिकेचा हिस्सा ३० टक्के होता. शासनाचा निधी मिळाल्यावर रस्त्यांची कामे सुरू झाली. त्यात धान्य गोदाम ते महामार्ग, वाडीभोकर रोड, स्वामिनारायण रोड, नकाणे रोडचा समावेश होता. वाडीभोकर व गोळीबार टेकडी रस्त्याचे काम झाले आहे. नकाणे रस्त्याचे काम थांबवण्यात आले असल्याने ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. या कामाची मुदत १८ महिने होती. ती आता डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मजीप्राने या रस्त्यावरील पाइपलाइनचे काम वेळेत केले नाही त्यामुळे काम होण्यास विलंब झाला आहे.

केवळ अर्धा किलोमीटर काम रखडले
कुमारनगर पूल ते वीर वि. दा. सावरकर यांचा पुतळा असे २ किलोमीटर काम होते. त्यानुसार पुलापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत डांबरीकरणाचे दोन लेअर झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते वि. दा. सावरकर पुतळ्यापर्यंत अर्धा किमी काम सहा महिन्यांपासून रखडले आहे.

प्राप्त निधीप्रमाणे रस्त्यांचे काम होईल
महापालिकेने आत्तापर्यंत त्यांच्या हिश्श्याचे केवळ ८ कोटी दिले असून, त्यांना ३० कोटी द्यावयाचे आहे. महापालिका प्रशासन ज्याप्रमाणे निधी जमा करणार त्यापटीत शासनाकडून रक्कम प्राप्त होईल. त्यानुसार उपलब्ध निधीतून कामे होतील.-धर्मेंद्र झाल्टे, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम

२० पैकी ८ रस्त्यांचे काम पूर्ण, ५२ कोटी रुपये अदा
शासनाने २० रस्त्यांसाठी निधी दिला होता. पण मनपाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम न भरल्याने शासनाचा निधी प्राप्त झाला नाही. आत्तापर्यंत ८ रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून ५ रस्त्यांचे काम ९० टक्के झाले आहे. सार्वजनिक विभागाला प्राप्त निधीतून ५२ कोटींचे बिल देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...