आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:क्षमा केल्यानेच आपण दुसऱ्याच्या आदरास होतो पात्र ; संस्काराचे दायित्व विषयावर मार्गदर्शन

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्षमा या शब्दात मोठी सकारात्मक ताकद आहे. समोरच्याची आपण माफी मागितल्यास तो आपल्या माफ करतो; परंतु तसे न झाल्यास त्यांच्या मनात बदल्याची भावना निर्माण होत असते. मात्र क्षमा मागितल्यास आपण दुसऱ्यांच्या आदरास पात्र ठरत असतो. त्यातून संबंधही मजबूत होऊन गैरसमज दूर होतात, असे विचार मुंबईच्या रेकी विशेषज्ज्ञ राजेश्वरी मोदी उर्फ राजदीदी यांनी हिरे भवनात झालेल्या अग्रवाल संमेलनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रमात केले. महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अधिवेशनाला शनिवारपासून शहरात सुरुवात झाली. त्यात महिलांसाठी आयोजित दुपारच्या सत्रात राजेश्वरी मोदी ह्या मार्गदर्शन करीत होत्या. याप्रसंगी उपस्थित महिलांना त्यांनी परिवारात संस्काराचे दायित्व या विषयावर मार्गदर्शन केले. केवळ मार्गदर्शन न करता उपस्थितांना त्यांच्या मनात असलेल्या विविध प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन परिवारातील संस्काराचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नारायण शास्त्राबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अन्नाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगितले की, अन्नाचा एकही कण वाया घालता कामा नये. अन्नाचा संबंध केवळ शरीराशी नाही तर मनाशीही असतो. त्यामुळे प्रत्येकाने आजपासून निश्चय करावा की एकही अन्नाचा दाणा वाया घालवणार नाही आणि गरजेपेक्षा जास्त खाणार नाही. तसेच जन्मकुंडलीचे आयुष्याचे महत्त्व हे प्रत्येकाच्या मानण्यावर असते. नारायण शास्त्र, ज्योतिष शास्त्रावर आपला किती विश्वास,श्रद्धा आहे यानुसार कुंडलीचे जीवनातील महत्त्व ठरत असते. जीवनात चांगले कर्म आणि वाईट कर्म असे दोन प्रकार आहेत. चांगले कर्म केल्याने समाधान, सुख आणि दुसऱ्याला आनंद देता येतो. मात्र ज्या कर्मामुळे दुसऱ्याला त्रास होतो ते चुकीचे कर्म असते. प्रत्येक कर्म हे कोणते ना कोणते फळ देत असते. मात्र आपण जीवनात नकारात्मक कर्म अधिक करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सेवा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यातही अशाची सेवा का केली पाहिजे जे तुम्हाला काही परतफेड करू शकत नाही. कारण नारायण तुम्हाला त्या सेवेचे फळ देणार असतो. त्यासाठी सेवा देताना त्याच्या परतफेडीचा भावना मनाता येता काम नाही असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित महिलांमधून त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. ते त्यांनी उदाहरणासह उत्तर दिली.

बातम्या आणखी आहेत...