आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. पण अद्यापही जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ५७ नागरिकांनी एकही डोस घेतला नाही. जिल्ह्यात ६५.४५ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याने हर्ड इम्युनिटी विकसित होण्यास मदत झाली आहे. ही स्थिती असली तरी बुस्टर घेणाऱ्यांचे प्रमाण फक्त साडेतीन टक्केच आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण चीनसह अन्य देशात आढळतात आहे. त्यामुळे चिंता वाढली असून कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात चांगला उपाय आहे. दोन वर्षापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात १२ वर्षापासून पुढील वयाेगटाचे १८ लाख ९७ हजार ६७७ नागरिक लस घेण्यासाठी पात्र आहे. त्यापैकी आत्तापर्यंत १५ लाख १ हजार ६२० नागरिकांनी पहिला तर १२ लाख ४२ हजार २९ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहे. तसेच आत्तापर्यंत १ लाख ६० हजार १८५ नागरिकांनी बुस्टर घेतला आहे.
वयोगटानूसार लसीकरण जिल्ह्यात आरोग्य व फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांनी १०० टक्के पहिला डोस घेतला आहे. आरोग्य विभागातील ९७.३४ टक्के कर्मचाऱ्यांनी तर ९६.७९ टक्के फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांनी दुसरा डाेस घेतला आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटात ७०.९७ टक्के लाभार्थींनी पहिला तर ४२.२६ टक्के लाभार्थींनी दुसरा, १५ ते १७ वर्ष वयोगटात ७०.८७ टक्के पहिला तर ४५.८५ टक्के दुसरा, १८ ते ४४ वयोगटात ७३.३४ टक्के पहिला तर ५८.९० टक्के दुसरा, ४५ ते ५९ वयोगटात ८४.१६ टक्के पहिला तर ७३.६६ टक्के दुसरा, ६० वर्षावर ८४.६७ टक्के पहिला तर ७५.२ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.