आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अर्जांची उद्या साेमवारी (दि.५) छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत शुक्रवारपर्यंत आहे. छाननीनंतर केवळ तीन दिवस माघारीसाठी मिळतील. जास्त अर्ज दाखल झाल्याने प्रमुख उमेदवारांची डाेकेदुखी वाढली आहे.
धुळे तालुक्यात ३३, साक्री तालुक्यात ५५, शिंदखेडा तालुक्यात २३ व शिरपूर तालुक्यात १७ ग्रामपंचायतींची निवडणूक होते आहे. सर्व ठिकाणी सरपंचाची थेट निवड हाेणार आहे. जिल्ह्यात सरपंचपदासाठी ४४६ तर सदस्यपदासाठी २ हजार ३२२ अर्ज दाखल झाले आहे.
अर्जांची छाननी उद्या साेमवारी (दि.५) हाेणार होईल. अर्ज माघारीसाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. तीन दिवसांत जास्तीत जास्त उमेदवारांचे अर्ज कसे मागे घेता येतील यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. जास्त उमेदवार रिंगणात राहिल्यास मतांची विभागणी हाेण्याचा धाेका आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांना अर्ज माघारीसाठी मनधरणी करावी लागणार आहे. त्यात त्यांना कितपत यश प्राप्त हाेते हे शुक्रवारनंतर समजेल.
प्रशासनाची छाननीची तयारी पूर्ण
अर्ज छाननी करताना अर्जासोबत सर्व कागदपत्र जाेडले आहे की नाही, माहिती पूर्ण भरली आहे का? आदींची पडताळणी केली जाणार आहे. विराेधकांकडून आक्षेप घेतले जाऊ शकतात. त्यादृष्टीने चारही तालुक्यात अर्ज छाननीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.