आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाईक महाविद्यालयात खुली देशभक्ती गीतगायन स्पर्धा; महाविद्यालयातून २५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग

शहादा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वसंतराव नाईक वरिष्ठ महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाविद्यालयांसाठी खुली देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव होते.

स्पर्धेचे उद्घाटक म्हणून सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव उपस्थित होत्या. या वेळी नादब्रह्म ग्रुपचे संचालक चंद्रकांत टेंबेकर, तालुक्यातील प्रसिद्ध तबला वादक खुशाल पाटील, संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, प्राचार्य डॉ.अशोक पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय. पाटील, हिमांशू जाधव उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातून २५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे प्रशस्तिपत्रासह बक्षीस देण्यात आले. प्राचार्य डॉक्टर अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थितांनी व विद्यार्थ्यांनी टाळ्या दाद दिली. प्रा.डॉ.आर.बी.मराठे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अशोक तायडे यांनी केले. आभार प्रा.डॉ.डी.वाय पाटील यांनी मानले.प्रा.डॉ.संतोष पाटील यांनी स्व.कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव यांचे जीवनावर आधारित गीत म्हटले.

यशस्वी स्पर्धक
प्रथम जयश्री संजय गिरासे (नाईक महाविद्यालय), द्वितीय जयश्री नगीन महाजन (शहादा एज्युकेशन संस्थेचे महाविद्यालय), तृतीय चेतन दयाराम शिंदे (लोणखेडा), चतुर्थ भावना दादासाहेब शिरसाठ (सोनामाई महिला महाविद्यालय), पाचवा हर्षदा भिका पाटील (बामखेडा महाविद्यालय).

बातम्या आणखी आहेत...