आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:एनपीएसला विरोध; जुनी पेन्शन लागू करा‎

धुळे‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनपीएस योजना बंद करावी‎ यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे २१ ते २६ नोव्हेंबर‎ दरम्यान एनपीएस हटाव सप्ताह व ‎जागृती मोहीम राबवण्यात येते‎ आहे. या सप्ताहाला सोमवारपासून ‎प्रारंभ झाला. त्यानुसार‎ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर‎ निदर्शने झाली. त्यात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह अन्य ‎विभागाचे कर्मचारी सहभागी झाले.

जुनी पेन्शन योजना लागू करावी,‎ अशी मागणी झाली.‎ केंद्र व राज्य सरकारने‎ पीएफआरडीए केंद्रीय कायद्यान्वये‎ सन २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन‎ अंशदायी पेन्शन याेजना लागू केली‎ आहे. ही योजना रद्द करून‎ राजस्थान, झारखंड, पंजाब‎ राज्याच्या धर्तीवर जुनी पेन्शन लागू‎ करावी, केंद्राचा पीएफ आरडीए‎ कायदा रद्द करावा,‎ आऊटसाेर्सिंगद्वारे भरती बंद करावी.‎

कंत्राटी पद्धत, फिक्स पे पद्धत बंद‎ करून संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत‎ नियमित करावे, अशी मागणी‎ करण्यात आली. सप्ताहात प्रत्येक‎ शासकीय कार्यालयात द्वारसभा‎ होईल. त्यानुसार सोमवारी‎ जिल्हाधिकारी कार्यालयात द्वारसभा‎ झाली. या वेळी राज्य सरकारी‎ कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष‎ सुरेश पाईकराव यांनी मार्गदर्शन‎ केले.

जुनी पेन्शन हक्क व कंत्राटी‎ कर्मचारी कृती समितीने आंदाेलनात‎ सहभाग नाेंदवला. जिल्हा‎ रुग्णालयात नीलेश चावरे, सुवर्णा‎ सूर्यवंशी, पाेलिस अधीक्षक‎ कार्यालयात तायडे, बांधकाम‎ विभागातील कैलास बाविस्कर,‎ समाधान साेनवणे, नलिनी‎ बाविस्कर, पूजन चाैधरी यांनी‎ मार्गदर्शन केले. या वेळी अध्यक्ष‎ सुरेश पाईकराव, सरचिटणीस‎ याेगेश जिरे, दीपक पाटील, मन्सूर‎ शेख, अशाेक चाैधरी, किशाेरी‎ अहिरे आदी उपस्थित होते.‎

आज येथे हाेणार द्वारसभा... माेहिमेंतर्गत उद्या मंगळवारी(दि. २२)हिरे मेडिकल काॅलेज येथे हाेणाऱ्या‎ द्वारसभेत पूनम पाटील,सुशील घाडगे,अझरूद्दी न आश्मे,आयटीआ यमध्ये भगवान बीडगर,भूषण रानवे,रेणुका‎ गाडेकर,शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमर देवरे,राेहिदास देवरे,वनविभागा त भूषण पाटील,प्रशासकी य संकुलात‎ शेख,मनी घुगे,याेगेश पाटील,कृषी पिंप्री फार्मला सुमीत नगराळे,दीपक कढरे,आयटीआे कार्यालयात गणेश देवरे,कीर्ती‎ सैंदाणे हे मार्गदर्शन करतील, अशी माहिती सुरेश पाईकराव यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...