आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलीचे आदेश:पाणीपुरवठा कर्मचारीच्या बदलीचे आदेश; निर्बीजीकरण विषय तहकुब

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वलवाडी येथील जलशुध्दीकरण कर्मचारी जुमानतच नाही. शुध्दीकरण प्रकल्पही रात्री बंद ठेवत असल्याची तक्रार केल्यानंतर स्थायी समिती सभापतीनी तात्काळ या कर्मचारीचे बदलीचे आदेश सभेतच दिले आहे. तर कुत्रे निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी कमी दर निविदा धारकाला प्रेझेटेशन व वाटाघाटीसाठी बोलवण्यात आल्यावरही येत नसल्याने हा विषय तहकूब ठेवण्यात आला.

पालिकेत सोमवारी स्थायी समितीची सभा घेण्यात आली. यावेळी सभेला स्थायी समिती सभापती शीतल नवले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, सचिव मनोज वाघ व सदस्य उपस्थित होते. सभेत विषय पत्रिकेवरील विषयावर चर्चा करण्यात येऊन मंजुरी दिली. प्रतिभा चौधरी नाजियाबानो पठाण, नागसेन बोरसे यांनी चर्चेत भाग घेतला.

मनपा व्यापारी संकुलप्रकरणी कारवाई करा
शहरातील अण्णा भाऊ साठे घरकुलाजवळील संकुल भाडे तत्वावर दिलेले नसतानाही दुकाने सुरु आहे. प्रशासनाने माहिती घेतली असून बाजार विभाग प्रमुख किशोर सुडके यांनी सभेत माहिती देतांना सांगितले की, व्यापारी संकुल बाजार विभागाकडे हस्तांतरीत झालेले नाही. या वेळी कारवाई करण्याचे आदेश सभापतीनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...