आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:आदेश मोठा पूल बंद करण्याचा; पण पादचारी पूलही बंद केल्याने गैरसोय

धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील १३३ वर्षांचा मोठा पूल स्ट्रक्चरल ऑडिटमुळे बंद करण्याचे आदेश आहे. त्यासाठी दोन्ही बाजूना बॅरिकेट्सही लावण्यात आले आहे; परंतु या पुलाशेजारी असलेला पादचारी पूलही त्यामुळे बंद झाला आहे. पादचारी पूल खुला करण्यासोबत धोकेदायक ठिकाणी रॉड बसवण्याची गरज आहे.सन १८८९ मध्ये बांधकाम झालेला ब्रिटिशकालीन पूल धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे तो बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तशी सूचना शहर वाहतूक शाखेला केली होती. शिवाय आदेशानुसार हा पूल बंद करण्यात आला आहे.

मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिके‌्टस लावताना पादचारी पूल सुरू राहील याकडे मात्र लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे पादचारींसाठी पर्याय असलेला हा पूल नकळतपणे बंद झाला आहे. महात्मा गांधी पुतळाजवळ अवघ्या दीड ते दोन फुटांची जागेतून पुलाकडे जावे लागते. तर पंचवटी जवळ ही बॅरिकेट्स आहे. शिवाय पादचारी पुलाच्या मधोमध बांधकामासाठी वाळू आणू ठेवली आहे. त्यामुळे पादचारींसाठी बांधलेला हा पूल सध्या तरी नागरिकांना उपयोगी पडत नाही. पादचारी पूल खुला झाल्यास वाहतुकीचा प्रश्नही सुटणार आहे.

५ ठिकाणी धोकेदायक
पादचारी पुलावरील संरक्षण रॉड देखील लांबवण्यात आले आहे. पुलावरून जाताना ५ ठिकाणी हे रॉड लांबवल्याचे दिसते. पादचारी पूल असाच बंद राहिले तर चोरट्यांचे फावेल. शिवाय उर्वरित रॉड ही चोरी जाऊ शकतात. या ठिकाणी रॉड पूर्ववत लावल्यास धोका ही टळेल.

बातम्या आणखी आहेत...