आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सहा वर्षांपूर्वी अपर तहसील कार्यालयातील सुविधा, कर्मचारींसंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी यांच्यातर्फे अपर तहसीलदारांना देण्यात आले आहे. कार्यालयातील असुविधा, कर्मचारी कमतरता आदीबाबतचे सविस्तर वृत्त दै. दिव्य मराठीने १० नाेव्हेंबर राेजी ठळकपणे प्रसिद्ध केले हाेते. त्याची दखल घेऊन हा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेचे नायब तहसीलदार शिंपी यांच्याकडून अपर तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे.
दिव्य मराठीने नागरिकांच्या साेयीसाठी स्थापन करण्यात आलेल्या अपर तहसील कार्यालयाची वस्तुस्थिती दर्शविणारे वृत्त प्रसिद्ध केले हाेते. त्याची दखल खुद्द जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून घेण्यात आली आहे. हा विषय महत्त्वाचा असल्याने त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असाही शेरा पत्रावर मारला आहे. त्यानुसार अपर तहसीलकडून अहवाल सादर करण्यात होणार आहे.
पत्राचा प्रवास कठीण: अहवालाकडे लागले लक्ष
यासंदर्भात दिव्य मराठीने १० राेजी वृत्त प्रसिद्ध केले. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर सामान्य शाखेकडून १६ नाेव्हेंबर राेजी पत्र तयार करण्यात आले. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या प्रशासकीय संकुलातील अपर तहसील कार्यालयात सदरचे पत्र ३० नाेव्हेंबर राेजी पाेहाेचले आहे. त्यानुसार आता अहवाल कधी दिला जाताे हे पाहणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.