आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट शिरपूर आयोजित उन्हाळी क्रीडा व सांस्कृतिक शिबिराचा समारोप झाला.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक शिबीर झाले. शिबिरात १६०८ विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला. व्यासपीठावर श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, शिरपूर पिपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा उपस्थित होते. प्रिशा अतुल भंडारी, हिमांशू भोजने, कशिश चौधरी, हिताक्षी महाजन यांनी उन्हाळी शिबीरात आलेले अनुभव कथन केले.
यावेळी संगित शिक्षक पी. आर. माळी, डान्स शिक्षक विक्की आखाडे, डान्स शिक्षक राकेश बोरसे, पूनम मोरे, वीरेंद्र पावरा, अनिल महाजन, गोपी सर तसेच प्रमुख समन्वयक डॉ. विनय पवार, समन्वयक प्रा. राहुल स्वर्गे, समन्वयक संदिप देशमुख, सचिन सिसोदिया, स्वप्नील मोरे (बॅडमिंटन), भूषण चव्हाण (कबड्डी), मोहम्मद शफीक (फुटबॉल), अयाज अहमद (फुटबॉल), करण शिंदे (खो-खो), सुभाष पावरा (ॲथलेटिक्स), अन्सारी नईम अख्तर (कॅरम), जयसिंग पाडवी (कराटे), कोमल ढोले (फुटबॉल), सागर माळी (खो-खो), स्वप्नील पाटील (व्हॉलीबॉल), कुणाल जैन (व्हॉलीबॉल), अनिकेत मोरे (क्रिकेट), कुणाल गिरासे (क्रिकेट), हरीश सोनवणे (हॅण्डबॉल), निखिल महाजन (कबड्डी), स्वप्नील पाटील (टेबल टेनिस), चेतन माळी (हॅण्डबॉल), रवींद्र ठाकूर (फुटबॉल), कन्हैयालाल माळी (कुस्ती), निकिता पाटील (तलवारबाजी), जगदीश वाणी (बास्केटबॉल), रेश्मा मराठे (कराटे), लवकेश देशमुख (क्रिकेट), मोनिका पावरा (ॲथलेटिक्स), विपूल ईशी (फुटबॉल) यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. एफ. शिरसाठ, मुख्याध्यापक सी. डी. पाटील, मुख्याध्यापिका मनिषा अंद्रियाज, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, विद्यार्थी, खेळाडू, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.